चंद्रपुरातील काँग्रेसच्या व्हीजेएनटी कार्यकर्त्यांचा खा. प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात संताप, एकही व्हीजेएनटी कार्यकर्त्याला तिकीट न दिल्याने मागितला खुलासा

चंद्रपुरातील काँग्रेसच्या व्हीजेएनटी कार्यकर्त्यांचा खा. प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात संताप, एकही व्हीजेएनटी कार्यकर्त्याला तिकीट न दिल्याने मागितला खुलासा, पक्षासाठी राब राब राबून अनुकूल वातावरण निर्मिती करणाऱ्या कार्यकर्त्याना नाकारली उमेदवारी, खा. धानोरकर यांनी केलेल्या तिकीटवाटपाची पक्षाने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

चंद्रपूर मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकीटवाटपावरून आरोपांच्या जोरदार फैरी केल्या जात आहेत. चंद्रपुरातील काँग्रेसच्या व्हीजेएनटी कार्यकर्त्यांनी उमेदवार निश्चित करणारी समिती आणि विशेषतः खा. प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. एकाही व्हीजेएनटी कार्यकर्त्याला तिकीट न दिल्याने त्यांच्याकडून खुलासा मागण्यात आलाय. पक्षासाठी राब राब राबून अनुकूल वातावरण निर्मिती करणाऱ्या कार्यकर्त्याना स्वजात, पैसा आणि वैयक्तिक हितसंबंध यामुळे खा. धानोरकर यांनी उमेदवारी नाकारल्याचा गंभीर आरोप केला गेलाय. खा. धानोरकर यांनी केलेल्या तिकीटवाटपाची पक्षाने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करतानाच बाहेरून आलेल्या उमेदवारांचे आर्थिक व्यवहार तपासा, निष्ठावंतांना न्याय द्या अशा मागण्या केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *