
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक (DNI) तुलसी गबार्ड यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरावा, अशी मागणी केली आहे. गबार्ड यांनी ओबामा यांच्यावर 2016 मधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयास बाधा आणण्याचा आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळाला कमकुवत करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
तुलसी गबार्ड यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ओबामांचा उद्देश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सत्तेवरून हटवणे आणि अमेरिकन जनतेच्या इच्छेवर घाला घालणे हा होता. ते कितीही शक्तिशाली असले तरी या कटात सहभागी प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे. कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाची विश्वासार्हता यावरच अवलंबून आहे. आम्ही सर्व कागदपत्रे न्याय विभागाला (DOJ) आपराधिक चौकशीसाठी सोपवत आहोत.
