
नागपूर: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. त्याने अंडरवेअरचा वापर करून आयुष्य संपवलं आहे. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या एका कैद्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच्या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
तुलसीराम शेंडे असं तुरुंगात आत्महत्या करणाऱ्या कैद्याचं नाव आहे. त्याने अंडरवेअरच्या इलास्टीकने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नागपूर सेंट्रल जेलमध्ये पुन्हा एकदा कैद्यांच्या सुरक्षेवर आणि मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुलसीराम शेंडे हा मध्यवर्ती कारागृहातील ‘रंग काम विभाग’जवळील गोदामाजवळ एका खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. धंतोली पोलिसांच्या तपासानुसार, त्याने आपल्या अंडरवेअरच्या इलास्टिकचा वापर करून फास तयार केला होता. याच फासचा वापर करून त्याने गळफास घेतला.
