गुप्तांगावर चावून केलं रक्तबंबाळ, नागपुरच्या तुरुंगात कैद्याचा भयंकर कांड, बरॅकमध्ये आक्रोश अन् किंचाळ्या

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर चावा घेतला आहे. हा चावा इतका भयंकर होता, की संबंधित कैदी रक्तबंबाळ झाला आहे. आरोपी कैद्याने चावा घेतल्यानंतर बराकमध्ये एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकू आल्या. यानंतर तुरुंगातील सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कैद्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याप्रकरणी चावा घेणाऱ्या कैद्यावर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा रमेश तिवारी असं गुन्हा दाखल झालेल्या 26 वर्षीय कैद्याचं नाव आहे. तो अंबाझरी येथील रहिवासी आहे. तर शुभम ठाकूर असे जखमी कैद्याचे नाव असून, त्याच्यावर सध्या कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *