निवडणूक आयोगातील मतभेदांतून आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, मुख्य निवडणूक आयुक्त मोदी सरकारचे गुलाम, वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
नागपूर, दि. २३: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरे करण्याचे स्वागत आहे, मात्र केवळ पाहणी करून उपयोग नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करून त्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मागील वर्षी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती. त्यावेळी 253 तालुके आणि सुमारे 68.7 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र घोषित मदतीपैकी प्रत्यक्षात अर्धीच रक्कम खर्च केली.सरकार घोषणा मोठ्या करते प्रत्यक्षात मदत करत नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत द्यावी, सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत. पीकच हातात येणार नसेल तर शेतकरी कर्जाची परतफेड कशी करणार? असा सवाल त्यांनी केला.
सरकारने पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि सत्ताधारी-विरोधकांना विश्वासात घेऊन मदतीचे पॅकेज निश्चित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळ परिस्थितीत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतील पैसा आधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करण्यासाठी वापरला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. केंद्र सरकार गुजरातला भरभरून मदत करतात आपण महाराष्ट्राने मदत मागिल्यावर अपेक्षित मदत मिळत नाही अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना मदत देण्यात विलंब झाल्यास पाणी, जनावरांचा चारा आणि टँकरची समस्या आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे सरकारने घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करावी, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात दुष्काळ असताना एका मंत्र्यांच्या मुलाचा वाढदिवस थाटात होतो यावरून हे सरकार ढोंगी असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. इतकी गंभीर परिस्थिती असताना त्याचे भान न ठेवता मुलाचा वाढदिवस साजरा करायची गरज होती का? यातूनच सरकार आणि मंत्री असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत अस वडेट्टीवार म्हणाले.
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या धक्कादायक बातमीनुसार निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या निर्णयांवर तब्बल 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. निवडणूक आयोगात घेतल्या गेलेल्या निर्णयावर या आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादीशी संबंधित सॉफ्टवेअरच्या केंद्रीकरणाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. Form-6 मधील बदलांना दोन्ही आयुक्तांनी अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचा म्हटले आहे.
व्होटचोटीचा आरोप सगळ्यात आधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता.आज तो सिद्ध झाला आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मोदी सरकारसला व्होटचोरीसाठी मदत करतात,ते सरकारचे गुलाम आहेत, यातून लोकशाहीचा खून झाला आहे असा घणाघात काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केला.
संविधानाने मतदारांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला आहे पण SIR आणि फॉर्म ६ माध्यमातून आणलेले नवीन नियम हे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवत आहे. पुढची पिढी मतदारयादीत दिसणार नाही, असा डाव या नियमातून दिसून येतो असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केला.
विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाली असून नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या जागा काँग्रेसला सोडण्यात याव्यात अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.
