
नागपूर : शहरातील नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थीनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांआधी नीटच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत अपयश आल्याने नागपुरात वनाडोंगरी येथील मंगलमूर्ती कॉलनीत राहणारी वैदेही अनिल उईके या विद्यार्थिनीने गळफास लावत जीवन संपवले. तर मंगळवारी एक दिवस आधी नागपुरातील अंबाझरी पोलिस स्टेशन हद्दीत मध्ये ख्वाहिश नागरे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
