सावकारी जाचामुळे किडनी विकणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर

सावकारी जाचामुळे किडनी विकणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिका-यांच्या खात्यात पीडित शेतकऱ्यासाठी शासनाकडून पाच लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

सावकारी जाचामुळे रोशन कुळे यांनी कंबोडिया येथे जाऊन आपल्या किडनीची विक्री केली होती. हे प्रकरण उघडकीस येतात राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना चंद्रपूर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीचा पर्दाफाश केला. मात्र या सर्व गोष्टी होत असताना पीडित शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने त्याला पाच लाखांची विशेष मदत दिली आहे. 19 तारखेला आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना पाच लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश दिला जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *