
कल्याणमधील नांदिवली परिसरात एका तरूणीला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका तरुणीवर परप्रांतीय तरुणाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला अन् मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असताना आता डॉक्टरांनी तरुणीच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
