गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यासाठी दंड! BMC चं नवं फर्मान, दंडाची रक्कम पाहून व्हाल हैराण

मुंबई: मुंबईतील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर केली जाते. मुंबई महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी कठोर नियमावली जाहीर केली असून आता गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डे काढणे महागात पडणार आहे. आता एका खड्ड्यासाठी तब्बल 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्वी हा दंड प्रतिखड्डा फक्त 2 हजार रुपये होता.
गेल्या वर्षी तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी शुल्कमाफी जाहीर केली होती.

पालिकेने मात्र यंदापासून 100 रुपये भरणे बंधनकारक केले आहे. मुंबईत सुमारे 12 हाजर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सव्वालाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गतवर्षी राज्य सरकारच्या आदेशानुसार या मंडळांना 5 वर्षांसाठी परवानगी देण्याचा निश्चय करण्यात आला होता. मात्र आता पालिकेने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार सर्व मंडळांना परवानगी आवश्यक असणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांवर यंदा नियमांचे विघ्न असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *