महाकाय मुंबई महापालिकेत महायुती होत असताना जे आवश्यक ते केले पाहिजे असे माझे मत , मी मनसे विषयी नाव घेऊन बोललो नसल्याचा केला खुलासा
महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद स्पष्टपणे नजरेस पडले. वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या वेगवेगळ्या भूमिकांबाबत चर्चा होत असताना चंद्रपुरात आ. वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली. असे निर्णय स्थानिक।पातळीवर घेतले।जातात असे सांगत महाकाय मुंबई महापालिकेत महायुती होत असताना जे आवश्यक ते केले पाहिजे असे माझे मत असल्याचे ते म्हणाले. मी मनसे विषयी नाव घेऊन बोललो नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
