योग्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी देण्यात आला काय करावे- काय नको मंत्र
चंद्रपुरात भाजपने मनपाच्या 450 नगरसेवक इच्छुकांसाठी आयडियाची कल्पना लढविली आहे. पुढील 40 दिवसात राज्य आणि केंद्र सरकारची विकासकामे जनतेत पोचविण्याचे लक्ष्य इच्छुकांना देण्यात आले आहे. योग्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीत इच्छुक उमेदवाराने काय करावे- काय नको याबाबत मंत्र देण्यात आला. चंद्रपूर भाजपात आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार संघर्ष आहे.
इच्छुकांचे अर्ज दोन्ही तंबूत स्वीकारले जात आहेत. त्यामुळेच मनपाच्या तिकिटा आपल्याच गटातून दिल्या जातील हे ठासून सांगण्यासाठी आ. जोरगेवार यांनी ही शक्कल लढविली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणे ही पक्षाची ताकद असल्याचे सांगत तिकीट वाटपात कार्यकर्त्यांना प्राधान्य असेल अशी ग्वाही आ. जोरगेवार यांनी दिली. ही बैठक उमेदवारीसाठीची चर्चा नाही, तर आपली एकता, संघटन आणि पक्षनिष्ठा दृढ करण्याचा क्षण आहे असे सांगत आपली एकजूट टिकवा, निष्ठेने काम करा, मतभेद विसरा आणि पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चलण्याचे आवाहन त्यांनी केले.
