पुणे–मुंबईकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता कल आता RCERT कडे

पहिल्याच CAP फेरीत 534 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

चंद्रपूर (प्रतिनिधी) :सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), बाबूपेठ, चंद्रपूर हे गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योगाभिमुख शिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या बळावर विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणात ओढा दिसून येत आहे.

संस्थेचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पूर्वी उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई आणि इतर महानगरांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता कल आता चंद्रपूरमधील RCERT कडे वळत असल्याचे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतून स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, 88 ते 94 सीईटी पर्सेंटाईल मिळविणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी पहिल्याच टप्प्यात प्रवेश निश्चित केला आहे. त्यामध्ये 94.34 पर्सेंटाईल मिळविणारे रुद्राक्ष रोहित बागडे तसेच 88.20 पर्सेंटाईल मिळविणारे सुमित घोष यांचा समावेश आहे. यावरून विद्यार्थी आणि पालकांचा महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर असलेला दृढ विश्वास अधोरेखित होत आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसोबतच पॉलिटेक्निक, एमबीए आणि एम.टेक. या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाला प्रोत्साहन, उद्योग क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे RCERT ने विदर्भातील अग्रगण्य तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
यंदाच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत झालेल्या पहिल्याच फेरीत 534 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. हा आकडा महाविद्यालयावरील विद्यार्थी व पालकांचा वाढता विश्वास, सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा ठोस पुरावा मानला जात आहे.

सन 1983 पासून उत्कृष्ट शैक्षणिक निकाल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, उद्योग क्षेत्राशी असलेले सशक्त संबंध, सातत्यपूर्ण प्लेसमेंट आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक वातावरणाच्या बळावर RCERT ने विदर्भात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे–मुंबईसारख्या महानगरांमध्ये शिक्षणासाठी जाण्याऐवजी अनेक विद्यार्थी आता चंद्रपूरमधील RCERT ला प्राधान्य देत असून, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतही विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून महाविद्यालयाने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

यंदाची प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रवेश समितीतील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *