चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी खाण विरोध आणि जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या मागण्यासाठीचे आंदोलन पाचव्या दिवसात पोचले

बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाच्या पाचव्या दिवशी ‘अर्धनग्न आंदोलन’

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज पाचव्या दिवशी प्रवेश केला.

या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात आले. अर्धनग्न आंदोलन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. गेले काही दिवस शहर जिल्ह्यातील विविध पर्यावरण विषयक संस्था, सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते या उपोषण मंडपाला भेट देत या अन्नत्याग सत्याग्रहाला आपला पाठिंबा देत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *