चंद्रपूर शहरातील एका महिलेला ५-६ लोकांनी पत्रकार असल्याचा धाक दाखवून तिच्या घरी जाऊन ती अवैध काम करत असुन त्याबाबत तिची बातमी प्रसिध्द न करण्यासाठी तिच्याकडून एक लाख रुपयाची मागणी करून पैसे न दिल्यास तिला ठार करण्याची धमकी देऊन तिच्याकडून जुलमाने एक लाख रुपये खंडणी स्विकारल्याची तक्रार रामनगर पोलीसांना प्राप्त झाली.
यात भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासा दरम्यान रामनगर पोलीसांनी या पत्रकारांबाबत माहिती घेतली असता ते चंद्रपूर शहरातील वेगवेगळया दैनिक न्युज पेपर, वेबपोर्टल न्युज व न्युज टी.व्ही. चॅनलचे संपादक, जिल्हा व तालुका प्रतिनिधी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांची नावे निष्पन्न केली.
१) सत्यशोधक न्युज, चंद्रपूर (वेबपोर्टल) मुख्य संपादक –
राजु नामदेवराव शंभरकर, वय ५७ वर्ष, रा. घर नं. ९८२, लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपूर
२) इंडिया २४ न्यूज, चंद्रपूर (वेबपोर्टल) चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी –
कुणाल यशवंत गर्गेलवार, वय ३७ वर्ष, रा. विठ्ठल मंदीर वार्ड मथुरा चौक चंद्रपूर
३) दैनिक विदर्भ कल्याण, उमरेड नागपूर (दैनिक न्यूज पेपर) चंद्रपूर तालुका प्रतिनिधी –
अविनाश मनोहर मडावी, वय ३३ वर्ष, रा. इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर
४) भारत टी.व्ही. न्यूज, आग्रा (टी.व्ही. चॅनल) चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – राजेश नारायण निकम वय ५६ वर्ष रा. जमनजेट्टी पाटील वाडी, लालपेठ वार्ड चंद्रपूर
अशी त्यांची नावे आहेत. या सर्व इसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी या गुन्हयाची कबुली दिली आहे. या गुन्हयातील नमुद आरोपीचे आणखी दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचाही शोध घेणे सुरु आहे.
