एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना करण्यात आले पट्टेवाटप , महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमात केल्या महत्वपूर्ण घोषणा
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदार संघातील या कार्यक्रमात त्यांची मात्र उपस्थिती नव्हती. बावनकुळे यांच्या उपस्थितीत एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पट्टेवाटप, प्रमाणपत्र वाटप, स्वामीत्व योजना लाभ वितरण, कृषी यांत्रिकीकरण लाभ वितरण असे अनेक लाभ कार्यक्रमात देण्यात आले महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमात महत्वपूर्ण घोषणा केल्या. 15-10-2024 च्या पूर्वी घेतलेले सर्व घरं कायदेशीर करणार असल्याचे सांगत
1) Deem regularisation योजना राबविणार असल्याचे सांगत त्यासाठी कायदा आणत असल्याचे म्हटले.
दरम्यान
2) प्रादेशिक आराखड्यात -रिजनल प्लॅन मध्ये दाखवलेल्या रहिवासी क्षेत्रात प्लॉट घ्यायचा असेल तर पुन्हा NA करावे लागते, आता हे संपवत असल्याचे सांगत यासाठी सनद रक्कम लागणार नाही, ती जिल्हा निधीतून देण्याची घोषणा त्यांनी केली.
