चंद्रपुरात आयोजित झाला एकता मार्च, लोहपुरुष सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित झाला मार्च

पोलीस दल, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक झाले सहभागी

चंद्रपुरात आक एकता मार्चचे आयोजन करण्यात आले. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हा मार्च आयोजित करण्यात आला. पोलीस दल, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यात सहभागी झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्च ची सुरुवात करण्यात आली. पोलीस बँड ने याप्रसंगी सुमधुर गीते सादर केली. उपस्थितांना एकात्मतेची शपथ देण्यात आली. राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हा मार्चचा उद्देश होता. सरदार पटेलांच्या एकसंघ भारताच्या विचारांना आत्मसात करून समाजात ऐक्याची भावना दृढ करण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.या उपक्रमातून चंद्रपूर पोलीस दलाने शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देत समाजाशी असलेले आपले बांधिलकी अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *