अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

राळेगणसिद्धी, दि. ११ प्रतिनिधी:आपल्या उपोषणाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनावर दबाव आणून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. राज्यात सशक्त लोकआयुक्त कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ३० जानेवारी २०२६ पासून समाजसेवक अण्णा हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *