निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरने निष्पाप बालकांचा मृत्यू झाला, हे व्हेंटिलेटर कोणी खरेदी करण्यास भाग पाडले ते देखील बालकांच्या मृत्यूला जबाबदार वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघाती हल्ला
अमरावती, दि. २६ : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी, कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिट यामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी ऑडिटच्या नूतनीकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्याची माहिती आहे. तरीही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. आरोग्यमंत्री केवळ चौकशीची घोषणा करून आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. या चौकशीचा अहवाल आठ दिवसात जाहीर केलाच पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवत आहे प्रकरणी आरोग्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारत म्हटले, २०२२ मध्येही याच रुग्णालयात व्हेंटिलेटरशी संबंधित घटना घडली होती.त्याची चौकशी झाली चार वर्ष त्याचा अहवाल आला नाही, कारवाई झाली नाही.
२०२२ मधील घटनेतही शिल्लर कंपनीचा व्हेंटिलेटर होता. सध्याच्या दुर्घटनेतही याच कंपनीच्या उपकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही व्हेंटिलेटर या रुग्णालयातून हटवली पाहिजे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या कंपनीचे मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर वापरात आहे.महाराष्ट्रातील लाखो रुग्णांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न आहे. सगळ्या रुग्णालयातूनच ही व्हेंटिलेटर हटवून नवीन व्हेंटिलेटर वापरावे याबाबत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी करणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ही व्हेंटिलेटर चायना मेड आहेत का? कोणाच्या दबावामुळे ही उपकरणे खरेदी केली गेली सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
२०२२ मध्ये चौकशी झाली तरी काही बदल झाला नाही,आता या घटनेनंतर आठ दिवसात आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल जाहीर केला पाहिजे.अमरावती प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही अधिवेशनात करू सरकारला जाब विचारू अस वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत करण्यात यावी, परिचारिकेने धाडसाने ६ बालकांचा जीव वाचवला,याची दखल घेतली पाहिजे. इतकी मोठी घटना घडल्यावर आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होणार असतील तर हे अत्यंत गंभीर आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख,
माजी महापौर मिलिंद चिमोटे
अमरावती महापालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले
जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख,
अमरावती महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखेडे,किशोर बोरकर
अनिकेत ढेंगले,
वैभव वानखेडे,
वैभव देशमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
