हल्ल्यात महिला शेतकऱ्याचा गेला होता जीव
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते.
18 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने लावारी परिसरात पिंजरे लावून वनपथके तैनात केली होती.
वनविभागाच्या या प्रयत्नांना यश आले. वाघाला जेरबंद केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून वन्यजीव शुश्रुषा केंद्रात रवाना करण्यात आले.
