किरकोळ वादातुन २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खुन,चंद्रपूर शहरातील एस पी विधी महाविद्यालय परिसरातील घटना

आरोपीना काही तासातच सर्व सहा आरोपीना अटक

चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील एस पी विधी महाविद्यालय समोरील परिसरात एक इसम रक्तबंबाळ व मृत अवस्थेत पडुन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथक घटनास्थळी पोचल्यावर मृत इसमाचे नांव नितेश वासुदेव ठाकरे २७ रा. बेताल चौक, दुर्गापूर असे असल्याचे समजले. ऐन दिवाळी सणाच्या काळात ही हत्या झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोस्टे ची वेगवेगळीपथके तयार करून शोध कार्य सुरु करण्यात केले. अवध्या काही तासात आरोपी निष्पन्न करत सर्वांना अटक करण्यात आली. किरकोळ वादातून आरोपी क्रमांक

(१) करण गोपाल मेश्राम वय २२ वर्ष रा.भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर
(२) यश छोटेलाल राऊत वय १९ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर
(३) अनिल रामेश्वर बोंडे वय २२ वर्ष रा. समता नगर दुर्गापूर
(४) प्रतिक माणिक मेश्राम वय २२ वर्ष रा. वार्ड क्र.४ दुर्गापूर
(५) तौसिक अजीज शेख वय २३ वर्ष रा. फातेमा मस्जीद जवळ वार्ड क्र. ३ दुर्गापूर
(६) सुजीत जयकुमार गणविर वय २५ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर यांनी नितेश वासुदेव ठाकरे याचा खुन केल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे.

हत्ये प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *