आज या आंदोलनाच्या मालिकेत शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला पायी मार्च
चंद्रपुरात ,पुणे मुंबई आणि कोलकाता या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाच्या मालिकेत शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मार्च काढण्यात आला. शेकडो चंद्रपूरकर या मार्चमध्ये सहभागी झाले.
गेली अनेक वर्षे रेल्वेला प्रचंड महसूल देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला पुणे- मुंबई कोलकाताशी जोडण्यासाठी रेल्वे गाडी नसल्याने पाठपुरावा सुरू आहे.केंद्र शासनाने तीन दिवसीय धरणे आंदोलनाची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी रेटण्यात आली आहे.
