चंद्रपूर शहरात टाटा आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या अत्याधुनिक दीनदयाल तर कर्क रुणालयात आता रुग्णांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. या रुग्णालयातील सर्व सुविधा गरीब आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. जिल्हा आणि आसपासच्या क्षेत्रातून रुग्ण इथे दाखल होत असून इथल्या सुविधांबाबत सतत फीडबॅक मिळावा यासाठी रुग्णालयात तक्रार आणि सूचनापेटीची सुरुवात करण्यात आली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे पंडित दीनदयाल कर्क रुग्णालयातील सेवा अधिक सुकर, सुलभ आणि रुग्णाप्रति स्नेहपूर्ण होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
