चंद्रपूर जिल्ह्यातील खनिज विकासप्रवास दर्शविणाऱ्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा खनिज निधीतून झालेल्या कामांचे विवरण असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. जिल्ह्यातील विकास प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या या पुस्तकात आरोग्य सुविधा उभारणी, शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा, रस्ते व पूल बांधकाम, पर्यावरण संवर्धन आणि रोजगारनिर्मिती अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा आहे. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद चे CEO पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. आपल्या संबोधनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर- गडचिरोली या जिल्ह्यांना इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून महत्त्व मिळत असल्याचे सांगितले. या दोन्ही जिल्ह्यात खनिज कामे मोठ्या प्रमाणावर होत असली तरी या दोन्ही जिल्ह्यात आता राज्य सरकारच्या योजनेनुसार वृक्षारोपणही करायचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. खनिज कामे होत असताना त्याचे फायदे स्थानिकांना मिळावे यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *