चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन पर अनुदान राशीचे वितरण

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती

आगामी काळात बँकेने आदिवासी महिला बचत गटांना देखील प्रोत्साहन राशी द्यावी शासन त्यामागे ठामपणे उभे राहील, पालकमंत्र्यांनी दिला शब्द

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन पर अनुदान राशीचे वितरण केले. जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांना ही राशी प्रदान करण्यात आली.

बँकेच्या कन्नमवार सभागृहात यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतल्या विषयी आनंद व्यक्त केला. आगामी काळातही बँकेने अशाच पद्धतीने आदिवासी महिला बचत गटांना बळ द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *