पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई, पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल ,दोन महिलांची सुटका
चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातल्या फारशी वर्दळ नसलेल्या हॉटेल रिलॅक्स मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने या हॉटेलवर काही दिवसांपासून पाळत ठेवली. पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करून घेतली. योग्य वेळी ग्राहक पाठवून धाड घातली गेली. सावजी पांडुरंग हस्तक वय 74 नामक वृद्ध मालकाला अटक करण्यात आली असून त्याचा मुलगा प्रदीप हस्तक वय 30 फरार आहे. दोघेही आरोपी पीडित महिलांना पैशाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून यासंबंधी सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
