कबड्डीकडे केवळ खेळ म्हणून नव्हे, तर करिअरच्या संधी म्हणून पाहा…! – महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे

📍 सामदा ता. सावली

सामदा येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना महेंद्रभाऊ म्हणाले की, कबड्डी हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून या खेळातूनही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही उत्तम कौशल्य आणि गुणवत्ता आहे. त्यांनी आपल्या खेळातील कौशल्याला मेहनत, शिस्त आणि सातत्याची जोड देत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी. खेळाकडे करिअरच्या दृष्टीने पाहून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा.

याप्रसंगी काँग्रेस नेते दुशांत भाऊ कीरसाण,दिवाकरजी भांडेकर, ढीवरुजी कोहळे, स्वप्निलजी भांडेकर, उमाजी कोहळे, अनिलजी पाल, विनायकजी कोसनकर, प्रशांतजी मडावी, बंडू जी पोहनकर, मोरेश्वर राव निकुरे, इंद्रजीतजी कुबडे, योगेशजी पिपरे, दिवाकरजी कायीरवार, अविनाशजी पाल,अनिलजी गुरनुले,श्रीरंग जी सोनुले, अनिल भाऊ कोठारे, नदीम भाऊ नाथानी,हिवराज खोब्रागडे,मिथुन बाबनवाडे,गौरव येणप्रेडिवार, विपुल एलटीवार, आयोजक, स्थानिक पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, क्रीडाप्रेमी आणि कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *