अबब घुग्घुस शहरात आठवा अजुबा

नगर परिषदेने सिमेंट काँक्रिट रस्त्यावर बनवला खडीकरण रस्ता

नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांना नोबल पुरस्कार द्या : नगर सेवक विवेक बोढे

घुग्घुस: शहरातील प्रभाग क्रमांक ३ हा खूप प्रसिद्ध झाला आहे. नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजुरेड्डी यांच्यासह दोन नगर सेवकांचा हा प्रभाग आहे म्हणून नाही तर वेगळे कारण आहे.

या प्रभागातील नवीन रेल्वे पुलाखालील दिलशाद यांचा घरापासून वणी रोडवर निघणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे या रस्त्यावर चक्क खडीकर रस्ता (माती मुरूम टाकून) नगर परिषदेतर्फे तयार करण्यात आला. नगर परिषदेच्या तुघलकी कारभारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिमेंट रोडवर माती टाकून खडीकरण रस्ता तयार केल्यामुळे मातीमधील असणारे पाणी खाली जमिनीत सिमेंट रोडमुळे मुरले नाही. भयानक चिखल झाले. खूप घाण झाली. वार्ड वासियांनी रोष व्यक्त करीत मुर्खासारखे तुम्ही असे कसे काम करता म्हणून नगर परिषद कर्मचाऱ्यांना जाब विचारला मग लगेच जेसीबी मशीन लाऊन माती काढली परंतु परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये जाऊन नगर सेवक विवेक बोढे यांनी स्वतः पाहाणी केली असता रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचलेले दिसले. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. ज्या प्रभागात नगराध्यक्षा राहतात व त्याच प्रभागातून उपनगराध्यक्ष राजुरेड्डी हे निवडून आले त्याच प्रभागाची दयनीय अवस्था आहे .
भारतात खडीकरण रस्त्यावर सिमेंट रस्ता बनवल्या जातो परंतु जगात पहिल्यांदा सिमेंट रस्त्यावर खडीकरन रस्ता बनवणाऱ्या नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के व उपनगराध्यक्ष राजुरेड्डी आणि अधिकाऱ्यांना नोबल पारितोषिक देण्यात यावे अशी मागणी नगर सेवक विवेक बोढे व घुग्गुस शहर वासीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *