गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी

* पोलीस अधीक्षक यांनी अतिदुर्गम बिनागुंडा येथील नागरिक व जवानांसोबत साजरी केली दिवाळी
* वरीष्ठ अधिका­यांनी साजरी केली दुर्गम भागातील नागरिकांसोबत दिवाळी
* जिल्हाभरातील सर्व 70 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे नागरिकांसोबत माओवादमुक्त दिवाळी साजरी
* वरीष्ठ अधिका­यांच्या उपस्थितीत नवजीवन वसाहत येथे आत्मसमर्पित सदस्यांसोबत साजरी करण्यात आली दिवाळी
* विविध सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना दिवाळीनिमित्त अन्नधान्य व फराळाचे वितरण

गडचिरोली पोलीस दलाकडून माहे मे 2026 मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहारच्या’ माध्यमातून गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात आला आहे. गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता व विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध लोकाभिमूख व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच समाजातील वंचित, गरजू आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील आहे. याच सामाजिक बांधिलकीतून दिवाळी सणाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्हाभरातील एकूण 70 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील नागरिकांसोबत तसेच नवजीवन वसाहत गडचिरोली येथील आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 08 नोव्हेंबर 2026 रोजी ‘माओवाद मुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली. यासोबतच गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट कृषी समृध्दी तसेच सेवा मित्र मंडळ व आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांची दिवाळी आनंददायी व्हावी, या उद्देशाने अन्नधान्य व फराळ वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवून शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

सदर उपक्रमाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी पोमकें बिनागंुडा येथे भेट देऊन तेथील नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. यासोबतच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा यांनी पोमकें गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी उप पोस्टे पेंढरी तसेच अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे. यांनी उपपोस्टे जिमलगट्टा येथील नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच सर्व उपविभागाअंतर्गत येत असलेल्या एकूण 70 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी यांच्या मार्फतीने दुर्गम भागातील नागरिकांना मिठाई व फटाके वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. यासोबतच माओवादाच्या हिंसक विचारसरणीचा त्याग करुन तसेच बंदुकीचा मार्ग सोडून शांततेचा आणि विकासाचा मार्ग स्वीकारणा­या आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे, तसेच त्यांच्यामध्ये सुरक्षितता, विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण व्हावी यासाठी आत्मसमर्पित सदस्यांना मिठाई व फटाके वाटप करून पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिका­यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित सदस्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात येऊन आत्मसमर्पित बांधवांसोबत फराळाचा आस्वाद घेण्यात आला.

यासोबतच जिल्ह्याच्या दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीत शेती करणा­या शेतकरी बांधवांना दिवाळीच्या सणानिमित्त मदतीचा हात देत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या उद्देशाने शेतकरी बांधवांसोबत अन्नधान्य व फराळ वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामूळे गरजू शेतकरी कुटंुबांना तसेच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून, त्यांच्या चेह­यावर आनंदाचे हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सणांचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश पोहोचविणे तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनात विकासाचा प्रकाश पोहोचविण्यासोबतच त्यांच्या सण-उत्सवातील आनंदात सहभागी होण्याची भूमिका गडचिरोली पोलीस दलाने या उपक्रमातून अधोरेखित केली आहे.

सदर उपक्रमाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी सांगितले की, “माओवादमुक्त गडचिरोलीच्या वाटचालीत केवळ सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थाच नव्हे, तर सामाजिक सलोखा, लोकसहभाग, विश्वास आणि विकास यांनाही तितकेच महत्त्वाचे आहे. पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शांततामय, सुरक्षित व विकसित गडचिरोली घडविण्यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा संकल्प गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आला आहे.”

सदर उपक्रम पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राबविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *