एकूण 05 अग्निशस्त्रे जप्त, अभियानादरम्यान 02 स्फोटकांसह विविध नक्षल साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट
सक्रीय नक्षल काळात आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत नक्षल्यांकडून स्फोटक साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात प्रभावी कारवाई करत नक्षल्यानी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलातील जवानांना यश आले आहे.
पोलीस ठाणे वांगेतुरी हद्दीतील मौजा माचुवंचा जंगल परिसरात अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. माहितीच्या आधारे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल परिसरात विशेष अभियान राबविण्यात आले. यात
1) 12 क्लेमोर
2) 01 – 12 बोअर रायफल
3) 03 सिंगल शॉट रायफल
4) 01 एअर गन
5) 01 बॉटल स्फोटक
6) 01 जिवंत क्लेमोर स्फोटक
7) 01 सेट वायरलेस माईक
8) 01 हत्याराचा लोअर हँडगार्ड
9) 100 नग सुतळी बॉम्ब
10) 05 जोड्या नक्षल गणवेशाचे हिरव्या रंगाचे कापड आदि नक्षल साहित्य पथकांव्दारे घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल साहित्य घटनास्थळावर नष्ट करण्यात आले आहे.
