चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेतून विजयी झालेले भाजपचे उमेदवार अरुण लाखानी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले विजयी प्रमाणपत्र

चंद्रपूर -गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेवरून विजयी झालेले भाजपचे उमेदवार अरुण लाखानी यांनी आज चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वसुमना पंतयांच्याकडून विजयी प्रमाणपत्र स्वीकारले. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यांनी तीन जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना धन्यवाद दिले.

आमदारकी मिळाल्यानंतर आता या तीन जिल्ह्यातील जलप्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत पैशाचा महापूर दिसल्याचा आरोप काँग्रेस कडून होत असताना त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. मात्र मी एवढे पैसे वाटू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या कोणत्या आमदाराने भाजपला मदत केली? या प्रश्नावर त्यांनी निवडणूक झालीच कुठे ?मग हा प्रश्न उपस्थित होत नाही असे उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *