नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशाने माजी मंत्री आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची महायुती समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला असून, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. यामुळे अनुभवी नेतृत्वाच्या माध्यमातून सर्व पक्षांमध्ये समन्वय साधण्याची गरज भासत आहे. महायुतीच्या वतीने भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपला अर्ज दाखल केला असून, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचे समन्वय आणि प्रचाराचे काम सुरू होणार आहे.

