चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक , अमोद रंदये (3) असे आहे सहाय्यक अभियंत्याचे नाव

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. अमोद रंदये (३८) असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत सोलर यंत्रणा बसविल्यानंतर ग्राहकाला वीज मीटर जोडणीसाठी रिलीज ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात त्यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *