राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त लोकमान्य टिळक विद्यालयात विविध विज्ञानविषयक उपक्रमांचे आयोजन

चंद्रपूर : भारताच्या अंतराळ संशोधनातील उल्लेखनीय प्रगती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे तसेच अंतराळ विज्ञानाविषयी कुतूहल व संशोधनवृत्ती वाढविण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर ‘ तसेच शाळेच्या ‘सिव्हिल लाईन्स शाखेत राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विविध विज्ञानविषयक उपक्रमांचे आयोजन’ करण्यात आले.

राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने दोन्ही शाखांमध्ये ‘Science Club’ चे उद्घाटन संस्थेचे सचिव माननीय ‘राहुलजी सराफ सर ‘ यांच्या उपस्थितीत व मुख्याध्यापक ‘श्री. प्रफुल्ल राजपुरोहित सर ‘ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ‘श्री. सचिन जहागिरदार सर’ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राहुलजी सराफ यांचे स्वागत Science Club चे प्रमुख ‘श्री. माहुरे सर ‘ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच उपमुख्याध्यापक श्री. सचिन जहागिरदार सर यांचे स्वागत वरिष्ठ विज्ञान शिक्षिका ‘सौ. शरयू श्रीगडीवार मॅडम’ यांनी केले.

शाळेच्या मुख्य शाखेत ‘पर्यवेक्षिका सौ. योगिनी देगमवार मॅडम, सौ. श्रीगडीवार मॅडम, श्री. अविनाश पिंपळशेंडे सर, सौ. रिमा खाणोरकर मॅडम आणि श्री. लोकेश सोरते सर’ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सिव्हिल लाईन्स शाखेत ‘प्रभारी पर्यवेक्षक श्री. मनोज पदलमवार सर’ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वरिष्ठ विज्ञान प्रमुख श्री. प्रमोद हनवते सर, सौ. सावसाकडे मॅडम आणि श्री. देहनकर सर’ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

‘Space Quiz Competition’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘Space Quiz Competition’ घेण्यात आली. या प्रश्नमंजुषेत भारतीय अंतराळ संशोधन, ISRO, चंद्रयान मोहिमा, भारतीय अंतराळवीर, उपग्रह, प्रक्षेपण वाहने तसेच भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीवर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आला.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या अंतराळ विज्ञानविषयक ज्ञानात भर पडली. तसेच त्यांच्यामध्ये ‘जिज्ञासा, स्पर्धात्मक वृत्ती, तर्कशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ‘ विकसित होण्यास मदत झाली.

‘India’s Space Odyssey – From Chandrayaan to Tomorrow’ माहितीपटाचे प्रदर्शन

दिनांक ’24 ऑगस्ट 2026′ रोजी शाळेच्या मुख्य शाखेसह सिव्हिल लाईन्स शाखेत विद्यार्थ्यांसाठी ‘India’s Space Odyssey – From Chandrayaan to Tomorrow’ या अंतराळविषयक माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

या माहितीपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ संशोधनाची वाटचाल, चंद्रयान मोहिमा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची प्रगती तसेच भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या संधी यांची माहिती मिळाली. माहितीपटामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी विशेष उत्सुकता व प्रेरणा निर्माण झाली.

या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय ज्ञानासोबत ‘प्रत्यक्ष अनुभवाधारित आणि अद्ययावत विज्ञानविषयक’ माहिती मिळाली. विज्ञानविषयक प्रयोग, प्रकल्प, प्रश्नमंजुषा, व्याख्याने व विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विज्ञानाशी प्रत्यक्ष संबंध वाढविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित Science Club चे उद्घाटन, Space Quiz Competition आणि ‘India’s Space Odyssey – From Chandrayaan to Tomorrow’ या माहिती पटाचे प्रदर्शन दोन्ही शाखांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि विज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *