प्रथम विजेत्या संघाची पुणे येथील राज्यस्तरीय फेरीसाठी निवड
चंद्रपूर : भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा ट्रस्ट (INTACH) द्वारे आयोजित ‘इंटॅक नॅशनल हेरिटेज क्विझ २०२६’ या स्पर्धेत छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.
ही प्रश्नमंजुषा २६ सप्टेंबर २०२६ रोजी शहर उच्च माध्यमिक विद्यालय, चंद्रपूर येथे सकाळी ९ वाजता पार पडली. भारताचा वारसा, संस्कृती, राष्ट्रीय, INTACH तसेच स्थानिक वारसा या विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका आणि तोंडी फेरी अशा स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता ७ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांच्या संघात सहभागी होत आपल्या ज्ञानाचे सादरीकरण केले.
स्पर्धेतील विजेते संघ
प्रथम क्रमांक — क्षितिज कोयाडवार व चंद्रसेन बेहूनिया
या प्रथम विजेत्या संघाची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्विझ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
द्वितीय क्रमांक — आलोकी कोंडबत्तुलवार व आर्या बुराडे
तृतीय क्रमांक — हर्षल पावडे व ओमकार कोयाडवार
चतुर्थ क्रमांक — श्रावणी सहारे व वेदांत लिपटे
स्पर्धेच्या गुणगौरव समारंभात विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व उत्कृष्ट भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी INTACH चंद्रपूर चॅप्टरचे संयोजक प्रवीन निखारे, सह-संयोजक विजयकुमार धांडे, मान्यवर प्रतिनिधी श्री. पुल्लावार सर तसेच INTACHचे सदस्य व कलाशिक्षक सुदर्शन बारापात्रे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष जिनेशभाई पटेल, मुख्याध्यापक राजीव मानकर, उपमुख्याध्यापक निंबाळकर सर, पर्यवेक्षक भूपाल सर तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरीसाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
