चंद्रपुरात भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमानी फेरबदल ठरले संतापजनक…

चंद्रपुरात भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमानी फेरबदल ठरले संतापजनक, आमदार किशोर जोरगेवार आणि महानगर अध्यक्ष सुभाष कासन गोट्टूवार यांच्या पक्षातून विलंबनाचीच नाराज उमेदवारांनी केली मागणी, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या यादीतील एकूण 11 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेच नसल्याचे धक्कादायक खुलासा

सुनील डोंगरे
गणेश रामगुंडावार
पूजा पोतराजे
कुणाल गुंडावार
पंचशीला चिवंडे
एडवोकेट हरीश मंचलवार
शितल कुळमेथे
मनीष बावणे
शुभांगी दिकोंडवार
अजय सरकार
माया उईके

ही यादी आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांची. मात्र यादीच जाहीर झाली नाही. आणि म्हणून यांना एबी फॉर्म मिळालेच नाही. परिणामी मोठाच संताप आणि उद्रेक झाला. चंद्रपुरात भाजप महानगर अध्यक्षांकडे पोहोचलेल्या मनपा उमेदवारांच्या यादीत मनमानी फेरबदल संतापजनक ठरले. हे बदल आमदार किशोर जोरगेवार आणि महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार याच्या निकटवर्तीयांना तिकिटे मिळावीत म्हणून मुद्दाम केले गेले. आता नाराजांनी थेट पत्रपरिषद घेत आ. जोरगेवार आणि पदमुक्त महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांना पक्षातून विलंबनाचीच मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या यादीतील एकूण 11 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेच नसल्याचा धक्कादायक खुलासा नाराजांनी केलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *