ऑक्टोबर महिन्यात नागपुरात निघणार मोर्चा
मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने आयोजित केली बैठक
मराठा समाजाच्या ओबीसी घटकातील संभाव्य थेट समावेशा विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात यासंदर्भात मोर्चा निघणार आहे. मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने बैठक आयोजित केली. बैठकीत ओबीसी समाज घटकातील समाज बांधव सहभागी झाले. मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकराने विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत ओबीसी बांधवानी दर्शविला.
