चंद्रपूर शहर मनापासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 17 प्रभागातून 66 जागांसाठी एकूण 636 उमेदवारी अर्ज दाखल

अनेक नगरसेवकांचा उमेदवारीत हिरमोड, तर मोठ्या प्रमाणात झाली बंडखोरी

चंद्रपूर शहर मनपासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 17 प्रभागातून 66 जागांसाठी एकूण 636 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. चंद्रपूर शहर मनपाने पाच झोनल कार्यालयांच्या माध्यमातून प्रभाग स्तरीय उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी व्यवस्था केली होती. चंद्रपूर भाजपाच्या उमेदवारी अर्जाचे एबी फॉर्म शहरातील एका नामांकित हॉटेलमधून पक्ष निरीक्षक आ. चैनसुख संचेती यांच्याद्वारे दिले गेले. तर काँग्रेसचे एबी फॉर्म खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बंगल्यातून उमेदवारांना थेट दिले गेले. काँग्रेस पक्षातर्फे विद्यमान बहुतांश नगरसेवकांची तिकिटे कापण्यात आली.

यात माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर ,सुनीता लोढीया, प्रशांत दानव यांच्यासह तब्बल दहा जणांचा समावेश आहे. दुसरीकडे आ. मुनगंटीवार – आ. जोरगेवार वादामध्ये भाजपने राजेंद्र अडपेवार, रवी आसवानी, विशाल निंबाळकर यांच्यासह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजय सरकार यांचेही तिकीट कापले. दरम्यान आज उमेदवारी अर्जाची छाननी असून त्यानंतर मैदानात कोण आहे हे स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *