चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे दुध विक्री करणाऱ्या महिलेवर इमारतीचा भाग कोसळला, महिला जखमी, उपचार सुरू

चंद्रपूर शहरात जटपुरा गेट परिसरात आज सकाळी दुध विक्री करणाऱ्या मनिषा सुनील लोखंडे (वय 50) या महिलेवर अचानक इमारतीचा काही भाग कोसळला. यात त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
लोखंडे कुटुंब गेल्या 35 ते 40 वर्षांपासून दूध व्यवसायाशी जोडलेले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतींचे आकस्मिक निधन झाल्यानंतर मनिषा लोखंडे यांनी एकट्यानेच व्यवसाय सुरू ठेवला. त्यांना दोन मुली असून त्या दोघींचे शिक्षण सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी महिलेला मदत केली. शहरातील धोकादायक इमारती मनपाने त्वरित पाडाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *