वरोरा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांच्या वरोरा येथील पुष्पांजली निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी आमदार करण देवतळे यांनी कुटुंबीयांसह श्री गणेशाची विधिवत पूजा-अर्चा करून आरती करण्यात आली.
गणरायाच्या आगमनाने देवतळे यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाचे स्वागत केले. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. यावेळी सर्वांनी श्री गणरायाकडे सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी सर्व देवतळे परिवार उपस्थित होते.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव असून, या काळात घराघरांत गणरायाचे स्वागत केले जाते. सामाजिक एकोपा, भक्ती आणि आनंदाचा संदेश देणारा हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे.
