खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

वरोरा : खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त धानोरकर कुटुंबीयांनी विधिवत पूजा-अर्चा करून बाप्पाचे स्वागत केले.

यावेळी कुटुंबीय तसेच आप्तेष्टांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुढील काही दिवस भक्तिभावाने गणरायाची आराधना करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *