चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या विरखल परिसरात आपल्या शेतात धान पिकात काम करीत असतांना पांडुरंग भिकाजी चचाने या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावली वनपरीक्षेत्र अंतर्गत पाथरी – विरखल मार्गावरील असोला मेंढा कालव्याला लागून असलेल्या शेतात सकाळी हा हल्ला झाला. परिसरात असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने पळ काढला. घटनेची माहिती वनपथकाला दिल्यावर पथक घटनास्थळी पोहचले आहे. याच परिसरात वाघीणीने पिलांना जन्म दिल्याची माहिती आहे. ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
