डोंगरगावात पहाटे अस्वल घरात घुसले, कुटुंब सुखरूप, अस्वल जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्य़ातील सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगावात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली. सुंदर जुमनाके यांच्या घरात अचानक अस्वल घुसल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र वेळेवर सावधगिरी बाळगत घरातील सर्व सदस्यांनी घराबाहेर पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

डोंगरगाव परिसराला लागून असलेल्या जंगलातूनच हे अस्वल घरात शिरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत हे अस्वल सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *