बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा, सांबराच्या पिल्लाचा रेल्वेखाली दुर्दैवी मृत्यू

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. लोहार येथे वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १० मध्ये चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत एका सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या मार्गावर यंदा एकूण ७ वन्यजीवांचे बळी गेले असून, त्यात ३ अस्वल, ३ सांबर आणि एका रानगव्याचा समावेश आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच नव्याने घोषित कन्हाळगाव अभयारण्याच्या लगतून जाणारा हा रेल्वेमार्ग वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरला आहे. मध्यप्रदेशात वन्यजीवांसाठी अंडरपास-ओव्हरपासची सुविधा आहे, मात्र महाराष्ट्रात अद्यापही अशा उपाययोजना न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी या गंभीर प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *