चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत “स्वच्छता दूत” बांधवांसाठी ‘रक्षाबंधन’ सोहळा उत्साहात संपन्न

आज दि. २८-०८-२०२६ ला मातोश्री मंगल कार्यालय तुकूम, चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत “स्वच्छता दूत” व “स्वच्छता कामगार” बांधवांसाठी एका विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर संगीता खांडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सन्माननीय संगीता भोयर या लाभल्या होत्या. तसेच उपसभापती सन्माननीय सडदाबी शेख या लाभल्या होत्या.

याप्रसंगी महानगरपालिकेच्या इतर सर्व सन्माननीय नगरसेविका श्रीमती सुनंदा धोबे, श्रीमती सुनिता जयस्वाल, श्रीमती करुणाताई चालखुरे, श्रीमती वनश्री मेश्राम, श्रीमती श्रुती घटे, श्रीमती श्वेता तोतडे, श्रीमती किरण कोतपल्लीवार, श्रीमती ज्योती जीवने, श्रीमती लता साव, श्रीमती मनीषा बोबडे, श्रीमती जयश्री जुमडे, श्रीमती सविता सरकार, श्रीमती डिनल केळझरकर देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या स्वच्छता दूत आणि स्वच्छता कामगारांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. उपस्थित नगरसेविका व महिला भगिनींनी स्वच्छता कामगार बांधवांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी बोलताना महापौर संगीता खांडेकर यांनी सांगितले कि, “स्वच्छता कामगार” हे आपल्या शहराचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या कष्टामुळेच आपले चंद्रपूर शहर स्वच्छ राहते.

आजच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.” महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनीही आपल्या भाषणात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांचे आभार मानले. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन सोहळ्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. राखी बांधल्यानंतर अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “समाजाकडून मिळणारा हा आदर आणि प्रेम पाहून आमचा हुरूप वाढला आहे” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचा समारोप सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप करून करण्यात आला. या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अधिकारी संतोष गर्गेलवार, रफिक शेख, चिंतेश्वर मेश्राम, रोशनी तपासे व कर्मचारी रेखा लोणारे, पांडुरंग खडसे, सुषमा करमनकर, ज्योत्स्ना देवतळे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *