चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील जनकापूर व चिंधी माल परिसरात दहशत माजवणाऱ्या टी-६१ एसएएफ वाघिणीला जनकापूर जंगलात बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. या वाघिणीने ४ ऑगस्टला रमेश काशिवार आणि १६ ऑगस्टला मोरेश्वर सावसाकडे यांचा बळी घेतला होता. गेल्या पाच महिन्यांत चौघांचा बळी घेतल्याची चर्चा आहे.जनकापूर शेतशिवारात रमेश जयराम काशीवार या शेतकऱ्याचा ४ ऑगस्ट २०२६ रोजी तर तुकूम येथील मोरेश्वर गोपी सावसाकडे शेतकऱ्याचा १६ ऑगस्ट २०२६ रोजी चिंधी माल परिसरात वाघाने बळी घेतला होता. १७ ऑगस्ट रोजी या वाघिणीला जेरबंद करण्याची परवानगी नागपूरच्या वन्यजीव विभागाने दिली होती.
