चंद्रपूर शहरात उघडकीस आला गॅस अवैधरित्या रिफिलिंग करणारा अड्डा

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोसारा येथील निर्जन भागात एका घरात चालत असलेला अड्डा पोलीस आणि यंत्रणेच्या मदतीने केला उघड, ग्राहकांमध्ये खळबळ

चंद्रपूर शहरात स्वयंपाकाचा गॅस अवैधरित्या रिफिलिंग करणारा अड्डा सुरू होता. पाळत ठेवल्यावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोसारा येथील निर्जन भागात एका घरात चालत असलेला अड्डा पोलीस आणि यंत्रणेच्या मदतीने उघड केला. मोठ्या प्रमाणात भरलेले आणि कमी वजनाचे ग्राहकांना दिले जाणारे सिलेंडर जप्त यात धाडीत जप्त करण्यात आले. चंद्रपूरच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. शहरातील वेगवेगळ्या गॅस एजन्सी मधून ग्राहकांच्या घरी निघणारी वाहने6 या ठिकाणी आल्यावर रिकाम्या सिलेंडर मध्ये विशेष नोझलच्या मदतीने गॅस भरला जात होता.

ग्राहकांच्या घरी मात्र दोन ते अडीच किलो कमी गॅस पोचत होता. चंद्रपूरच्या पुरवठा आणि महसूल अधिकाऱ्यांची मात्र संपूर्ण प्रकरणात संथगती दिसली. पुरवठा अधिकाऱ्यांकडे एचपी – इंडेन या मातब्बर कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांचे साधे मोबाईल नंबर नसल्याचे उघड झाले. कुणीही वरिष्ठ अधिकारी या जागी पोचला नाही. आम आदमी पक्षाने हे संपूर्ण रॅकेट बाहेर काढत ग्राहकांना न्याय आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *