५०० च्या ९१ लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त, चंद्रपूर पोलिसांच्या धाडीने हातात आली टोळी

रंगीत छायांकीत नोटा, प्रिंटर आणि साहीत्य जप्त, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या कारवाईत मोठा खुलासा

चंद्रपुरात ५०० च्या ९१ लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या धाडीने एक टोळीच हातात आली आहे. एका बंद फ्लॅटमध्ये रंगीत छायांकीत नोटा, प्रिंटर आणि साहीत्य जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या कारवाईत हा मोठा खुलासा झालाय.

शहरातील उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजश्री अपार्टमेंट फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही इसम हे अवैधरित्या ५०० रू च्या रंगीत छायांकीत नोटा तयार करीत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावर सापळा रचण्यात आला. सुमित कालीपथ पॉल, रा.बंगाली कॅम्प चंद्रपूर याच्या मालकीच्या या कुलूपबंद फ्लॅटमध्ये मध्यप्रदेश राज्यातील नागरिक वास्तव्याला असल्याचे समजले. कुलूप तोडून फ्लॅटची झडती घेतल्यावर खर्ड्याच्या 10 बॉक्समध्ये ५०० रू दराच्या रंगीत छायांकीत नोटा आणि मुद्देमाल आढळला. याप्रकरणी शुभम दिनेश नागर, वय २६ वर्ष, राह. पंचेड, तहसिल रतलाम, जि. रतलाम, मध्यप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पो.स्टे. दुर्गापूरचे पथक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *