चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळ

रखडलेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय नसल्याने संतापले सर्वपक्षीय नगरसेवक, काँग्रेसचा खा. धानोरकर गट आणि जनविकास सेना- एम आय एम ने घातला सभेवर बहिष्कार ,मुख्यालयासमोर केली जोरदार निदर्शने

चंद्रपूर महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला. या रखडलेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवक संतापले. काँग्रेसचा खा. धानोरकर गट आणि जनविकास सेना- एम आय एम ने सभेवर बहिष्कार घालत मनपा मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. महापौर संगीता खांडेकर या लोकशाही विरोधी आणि मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. अशा पद्धतीने नगरसेवकांचा सहभाग नसलेल्या आमसभा घेत त्यात ठरवलेले निर्णय शहरासाठी नुकसानकारक ठरणार असल्याची टीका विरोधी नगरसेवकांनी केली आहे. गेले सहा महिने मनपा स्थापनेनंतरही स्वीकृत सदस्य निवडीचा विषय अजिंडियावर न घेतल्याने संतापलेल्या नगरसेवकांनी महापौर कुणाच्या सांगण्यावरून महापालिका हाताळत आहेत असा सवाल विचारला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *