चंद्रपूर शहरातील मुख्य गांधी चौकात भीम जयंती उत्सवाला रात्री गालबोट लागले. रात्री डी जे मध्ये नाचण्याच्या वादातून पाच युवकांनी एकाला भोसकले. रविकांत टेंभूरकर 36 याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झालाय.
पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह पाच युवकांना हत्येप्रकरणी अटक केली आहे. डीजे दरम्यान नाचताना लागलेला धक्का भांडणाचे कारण ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. यामागे नक्की कारण काय? हे युवक शस्त्र घेऊन रॅलीत का पोचले? मयत आणि ही टोळी यांच्यात पूर्व वैमनस्य होते का? यासह पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे.
