चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, सराईत गुंड दिलशान काजी याला पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह केली अटक

आपल्याकडे असलेल्या गावठी पिस्तुलासह लोकांमध्ये दहशत पसरविणारा चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळच्या मुन्ना कॅन्टीन परिसरातला सराईत गुंड धीरज मोहन दयाल उर्फ दिलशान काजी याला चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अटक केली. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाला या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या गुंडाला अटक करण्यात आली. त्याच्या जवळून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. या सराईत गुन्हेगाराला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *